शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वाशिम बसस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:42 IST

विश्रामगृहालगतच्या भागात वाहनांची पार्कीग व्यवस्थेची जागा वगळता ईतर ठिकाणी प्रवासी लघुशंकेसाठी वापर करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘प्रवाशांच्या सेवेत’ही बिरुदावली घेऊन सर्वत्र मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे वाशिम बसस्थानक मात्र आजघडीला विविध समस्यांचे आगार बनले आहे़ या बसस्थानकासमोर व स्थानकामध्ये घाणीचे प्रचंड प्रस्थ वाढले असून,याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या आसनासमोरुन वराह मुक्तसंचार करताना दिसून येत असताना याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.काही वर्षापूर्वी वाशिम बसस्थानकाचे विभागात नाव होते. हे बसस्थानक उत्पन्नामध्ये विभागात अव्वल होते. येथून अनेक लांबपल्ल्याच्या बसेस सुरु होत्या.परंतु, आज घडीला गत वैभव हवेत उडाले असून, केवळ समस्याच मागे उरल्या आहेत़.  बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गटार साचले आहे. त्यावर होणाºया डासांच्या उत्पत्तीमुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे. फलाटांवरही कचºयाचे ढीग साचलेले आहेत़या बसस्थानकात मोठ-मोठे खड्डे पडलेले असून, त्यामध्ये साचणारे पाणी प्रवाशांचे कपडे चिखलाने माखवीत असते़. विश्रामगृहालगतच्या भागात वाहनांची पार्कीग व्यवस्थेची जागा वगळता ईतर ठिकाणी प्रवासी लघुशंकेसाठी वापर करीत आहेत. याच भागात घाणपाणीही मोठ्या प्रमाणात साचले आहे. डुकरांच्या धुडगुसाबाबत तर न बोललेच बरे़.महिला प्रवाशांची कुचंबनाबसस्थानकाच्या मुत्रीघरात स्वच्छतेचा अभाव आहे़ नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे येथे दुर्गधीच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ परिणामी पुरूष प्रवाशी मुत्रीघरांऐवजी उघड्यावर लघुशंका करतात़ पुरूषांचीच अशी अवस्था आहे़ तर महिलांना किती त्रास सोसावा लागत असेल हे त्यांनाच ठाऊक यामुळे महिला प्रवाश्याची कमालीची कुचंबना होते़ फ लाटाचीच्या स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे़ फ लाटांची स्वच्छता होत नसल्यामुळे तेथे कचºयाचे ढिग पडलेले असतात़चालकांच्या मनमानीने कळस गाठला आहे़ चालक मनाला वाटेल तेथे गाड्या लावतात़ गाड्यांच्या फ लकांची त्यांनी अ‍ॅलर्जीच आहे़ त्यामुळे प्रवाश्यांना गाडी कधी लागली अन् कधी गेली हे कळत नाही़.

वराह, श्वानांचा धुडगुस नित्याचाचबसस्थानकात आजमितीला डुकरांनी, कुत्र्यांनी धुडगूस चालविला आहे़ प्रवाशांच्या सामानाचे लचके तोडणे, लहान मुले, महिलांच्या अंगावर धावून जाणे असे प्रताप या प्राण्यांपासून सर्रास सुरू असतात़ आज(दि़१४ ) या डुकरांनी कहरच केला़ तालुक्यातील एक दाम्पत्य बाहेरगावी जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते़ त्यांच्या हातातील पिशवी त्यांनी प्रवासी फलटावर ठेवली ़ पिशवीत काही खाण्या-पिण्याच्या सामानासह कपडे ठेवलेले होते़ डुकराने त्यांच्या पिशवीवरच डल्ला मारला व संपूर्ण पिशवी घाण करुन ठेवली. पिशवीतील खाण्याचे पदार्थ फ स्त केले़ तर कपडेही घाण केले. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

सद्यस्थितीत सफाई कामगारांचा ठेका संपला असून यामुळे ही परिस्थिती उदभवली आहे. तरी सुध्दा आगाराकडून तात्पुरते नियोजन म्हणून काही सफाई कामगाराकडे स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे. दिवसातून तीन वेळा ते आगाराची स्वच्छता करीत आहेत. तरी याकडे लक्ष देतोय.-विनोद इलामेआगार व्यवस्थापक , वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी