शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील ६५० विहिरींची कामं ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 10:54 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील मंजूर असलेल्या ७०० विहिरींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून लालफितशाहीत अडकला आहे. परिणामी, ६५० विहिरींसाठी असलेल्या १७.५५ कोटींच्या निधीचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वाशिम - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील मंजूर असलेल्या ७०० विहिरींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून लालफितशाहीत अडकला आहे. परिणामी, ६५० विहिरींसाठी असलेल्या १७.५५ कोटींच्या निधीचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मागील आर्थिक वर्ष सन २०१६-१७ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतक-यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी ७०० नवीन सिंचन विहीरी मंजूर झाल्या होत्या. मे २०१७ या महिन्यात लाभार्थींची निवड करण्यात आली आणि विहिरींची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३० जून २०१७ अशी ठेवण्यात आली. एका महिन्याच्या कालावधीत विहिरींची कामे शक्य नसल्याने केवळ ५० शेतक-यांनी या नियमाची पुर्तता केली तर उर्वरीत शेतक-यांची कामे अपूर्ण राहिली. 

एका विहिरीसाठी व सिंचन साहित्यासाठी साधारणत: दोन लाख ७० हजार रुपयांचा निधी अनुदान स्वरुपात मिळतो. जवळपास ६५० विहिरींची कामे अपूर्ण असल्याने १७.५५ कोटींचा निधी पडून आहे. या लाभार्थींना सिंचन विहिरीचा लाभ मिळाला नाही. या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ पुढील आर्थिक  वर्षात मिळावा यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने ३ ऑगस्ट २०१७ च्या पत्रानुसार मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने त्या प्रस्तावाचा विचार करून २८ सप्टेंबर २०१७ रोजी  सदर विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात यावी आणि सदर अधिकार जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे सदरचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त होवून दोन महिन्याचा कालावधी लोटला. तथापि, अद्यापपर्यंत मुदतवाढ देण्याची कोणतीही कार्यवाही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून झालेली नाही. मुदतवाढीनुसार, अपूर्ण विहिरींची कामे पुर्ण करण्यासाठी केवळ चार महिन्याचा कालावधी उरला आहे. कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पाहून माजी पंचायत समिती सदस्य विनोद जोगदंड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांच्याशी बुधवारी चर्चा केली. यावेळी जोगदंड यांनी यावर्षीची नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय शेतक-यांच्या नाजूक आर्थिक परिस्थितीची जाणीव अधिका-यांना करून दिली. सदर विहिरींच्या बांधकामाला मुदतवाढ देवून कार्यारंभ आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जोगदंड यांनी केली.

दरम्यान, एकिकडे शासनाने जवाहर धडक सिंचन विहिर योजना, नरेगातून धडक सिंचन विहिर योजनेत वर्ग करण्यात आलेल्या विहिरी व रद्द केलेल्या विहिरींपैकी पुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहिरीला ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गतच्या सिंचन विहिरीला मुदतवाढ देण्यास प्रशासनाने टाळाटाळ चालविल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला. 

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर