शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:18 IST

अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे.

ठळक मुद्दे१८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली.रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन'चे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसामपासून सर्वच कामे बमद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी त्वारी गहू, हरभरा पिकाच्या काढणीसह फळपिकांची तोडणी करता आली नाही. अशातच जिल्हाभरात बुधवार २५ मार्च रोजी रात्ऱी आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. यासाठी विमानसेवा, रेल्वेसेवा, एसटी बसही बंद करण्यात आल्या, तर सार्वजनिक ठिकाणावर होणाºया गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती लक्षात घेत. २२ मार्चला जनता कफ्यू, त्यानंतर १४४ कलम आणि मंगळवारपासून ‘लॉक डाऊन’चे आदेशही जारी करण्यात आले. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना शेतात काढणीवर आलेला गहू आणि हरभºयाची काढणी करणे शक्य झाले नाही, तर काहींना काढून ठेवलेली ही पिके घरीही आणता आली नाहीत. त्यात बुधवारी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यात मंगळवार १७ मार्च आणि बुधवार १८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५००८ शेतकºयांच्या ४८२५.५ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला होता. त्यात आता २५ मार्च रोजी रात्री आलेल्या पावसाने अधिकच भर टाकली आहे. आसेगाव परिसरात अवकाळी पावसाने नांदगाव, शिवनी, चिंचखेड, चिंचोली, पिंपळगाव, कुंभी या गावातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

बुधवारी रात्री आलेल्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची माहिती संकलित केली. तथापि, प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे आढळले नाही. प्रत्यक्ष पाहणीनंतर नुकसानाचे प्रमाण कळू शकेल.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरीHailstormगारपीट