शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वाशिम : ६३ उमेदवारांनी दाखल केले ९२ उमेदवारी अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:04 PM

७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ४ आॅक्टोबर या अंतिम मुदतीपर्यंत ६३ उमेदवारांनी ९२ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केले आहेत. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात २६ उमेदवारांनी ३८ अर्ज, वाशिममध्ये १७ उमेदवारांनी २१ अर्ज आणि कारंजा मतदारसंघात २० उमेदवारांच्या ३३ अर्जांचा समावेश आहे. दरम्यान, ७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी रिसोड मतदारसंघातून २० उमेदवारांनी ३० अर्ज सादर केले असून आतापर्यंत २६ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. कारंजा मतदारसंघात १२ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत २० उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले. ४ आॅक्टोबरला वाशिम मतदारसंघातून १४ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले असून आतापर्यंत १७ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले.शुक्रवारी रिसोड मतदारसंघातून आमदार अमित झनक (काँंग्रेस), विश्वनाथ सानप (शिवसेना), माजी खासदार अनंतराव देशमुख (अपक्ष), माजी आमदार विजयराव जाधव (अपक्ष), दत्तराव धांडे (एमआयएम), विजयकुमार उलामाले (मनसे), शे. ख्वाजा शे. फरीद (बसपा), बबनराव मोरे (किसान समाज पार्टी) या प्रमुख पक्षासह आदींनी अर्ज सादर केले.वाशिम मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे (वंचित बहुजन आघाडी), रजनी राठोड (काँग्रेस), नीलेश पेंढारकर (अपक्ष), दिलीप भोजराज (बसपा), संतोष बन्सी कोडीमंगल (प्रहार जनशक्ती) यासह १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.कारंजा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रकाश डहाके (राकाँ), डॉ राम चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), डॉ. सुभाष राठोड (मनसे), मनिष मोडक (प्रहार जनशक्ती), गजानन अमदाबादकर (अपक्ष) यांच्यासह २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ आॅक्टोबर असून, त्यानंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोरी होऊ नये म्हणून नाराजांची मनधरणी सुरू आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019