शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

वाशिम : २२४ जि. प.शाळांच्या ४०९ शिकस्त वर्गखोल्या पाडणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:25 IST

काही वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असून अपघाताची घटना नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या २२४ शाळांच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त असल्याने संभाव्य अपघाताची घटना टाळण्यासाठी सदर वर्गखोल्या पाडण्याची तयारी शिक्षण विभागाने चालविली आहे. निर्लेखित वर्गखोल्यांचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे येत्या आठवडाभरात पाठविला जाणार आहे. या वृत्ताला शिक्षण विभागाने २१ फेब्रुवारी रोजी दुजोरा दिला.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ७७९ शाळा असून येथे शिक्षण दिले जाते. काही शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत तसेच काही शाळांच्या वर्गखोल्या शिकस्त झालेल्या आहेत. शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्हयातील २२४ शाळेच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त आहेत. यामधील काही वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असून अपघाताची घटना नाकारता येत नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वर्गखोली पाडता येत नसल्याने शिक्षण विभागाने या निर्लेखित वर्गखोल्यांची प्रशासकीय प्रक्रिया हाती घेतली आहे.जिल्हा परिषदेत राकाँ, काँग्रेस व सेना ही महाविकास आघाडी व भारिप-बमसंची सत्ता स्थापन झाल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा झाली. या सभेत निर्लेखित (वर्गखोल्या पाडणे) ४०९ वर्गखोल्यांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, येत्या आठवडाभरात हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला जाणार आहे. अधीक्षक अभियंत्यांच्या चमूने ‘स्ट्रक्चरल आॅडीट’ केल्यानंतर नेमक्या किती वर्गखोल्या पाडावयाच्या याची निश्चिती होणार आहे. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिकस्त वर्गखोल्या पाडण्याची प्रशासकीय कार्यवाही करण्याचे नियोजन आहे. बांधकामासाठी १५७ शाळांना निधीच मिळेनाएकूण १५७ वर्गखोल्यांची नितांत आवश्यकता असून, या वर्गखोल्यांसाठी निधी मिळावा, याकरीता शिक्षण विभागाकडून एका वर्षापूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजूरी मिळालेली नाही.सन २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपायला केवळ सव्वा महिला शिल्लक आहे. या सव्वा महिन्यात राज्य शासनाकडून निधी मिळाल्यास १५७ वर्गखोल्यांच्या बांधकामाचा प्रश्न निकाली निघेल.

जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येईल. १५७ वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.- चक्रधर गोटे, सभापती, शिक्षण व आरोग्य, जिल्हा परिषद वाशिम

२२४ शाळांच्या ४०९ वर्गखोल्या शिकस्त असल्याने त्या पाडण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला होता. हा ठराव मंजूर झाल्याने, पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.-अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा