शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : जिल्ह्यात परतले २७ हजार नागरिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 10:44 IST

ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश आहे.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार २०९ नागरिक आपापल्या परत गावी आले आहेत. त्यात ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.वाशिम जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यातत प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. ते आता परत येत असून, आरोग्य तपासणी केली जात आहे.ग्रामीण भागात २३ हजार २०९ नागरिकगेल्या आठवडाभरात पोलीस पाटलांनी घेतलेल्या माहितीनुसार सहा तालुक्यातील ग्रामीण भागांत तब्बल २३ हजार २०९ नागरिक, तर शहरी भागांत ४ हजार नागरिक परत आले आहेत.

गावाकडे नागरिकांची धावजिल्ह्यातील बरीच मंडळीही महानगरात किंवा विदेशात नोकरीसाठी स्थायिक झालेली आहेत. आता जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यावर उपचारासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लसीची निर्मितीही झालेली नाही. त्यामुळे जिवाच्या भीतीने विदेशात, परराज्यात आणि राज्यातील महानगरांत गेलेल्या नागरिकांनी आपापाल्या गावी धाव घेतली आहे.विदेशातून परतलेले ३२ नागरिक स्वस्थविविध कारणानिमित्त विदेशात गेलेले ३२ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. या सर्वांनाच होम कॉरन्टिनमध्ये ठेवण्यात आले. त्यापैकी २१ जण होम कॉरन्टिमधून बाहेरही पडले असून, आता केवळ ११ जण होम क्वॉरन्टिंनमध्ये असले तरी, एकातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत.

अद्याप एकही संशयित नाहीगेल्या आठवडाभरात पोलीस पाटलांनी घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २७ हजार नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. या नागरिकांची तपासणी केली असून, आजवर एकही नागरीक संशयित नाही.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस