लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे (वाशिम) : परिसरातील वरदरी खु. येथून अंत्यविधीच्या कार्यक्रमास जात असलेले अॅपे वाहन जऊळका रेल्वे येथील पंडितबाबा संस्थानजिक उलटले. यात वाहनात बसून असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला; तर इतर पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवार, १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी वाहन चालकाविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. याबाबत प्राप्त माहितीनुसार, अॅपेचालक संतोष मुंढे यांनी आपले वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालविल्यामुळेच एम.एच.३७ जी २७८३ क्रमांकाचे वाहन जऊळका रेल्वे येथील पंडितबाबा संस्थानजवळ उलटले. यात माझा भीमराव कांबळे (वय ५५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. तसेच बन्सी कांबळे (वय ७० वर्षे), वसंता इंगळे यांच्यासह इतर तीन प्रवासी जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णवाहिकेने उपचारासाठी अकोला येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. याप्रकरणी मृतकाचा भाऊ जयभारत कांबळे यांनी जऊळका पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी वाहनचालक संतोष मुंढे याच्याविरूद्ध कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे वरदरी गावात शोककळा पसरली आहे.
वाशिम : अॅपे वाहन उलटून १ ठार, पाच जखमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:48 IST
जऊळका रेल्वे (वाशिम) : परिसरातील वरदरी खु. येथून अंत्यविधीच्या कार्यक्रमास जात असलेले अॅपे वाहन जऊळका रेल्वे येथील पंडितबाबा संस्थानजिक उलटले. यात वाहनात बसून असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला; तर इतर पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवार, १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी वाहन चालकाविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
वाशिम : अॅपे वाहन उलटून १ ठार, पाच जखमी!
ठळक मुद्देजऊळका येथील घटना वाहन चालकावर गुन्हा दाखल