शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचा आराखडा तयार होणार; राजकीय हालचालींना वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 11:26 IST

Municipal Counsil Election : प्रभाग पध्दतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होईल.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी काळात मुदत संपणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायतचा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला जाणार असल्याने, राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होईल, यात शंका नाही.डिसेंबर २०२१  ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायतींची प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील मालेगाव व मानोरा नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. या नगर पंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आला. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सन २०१६-१७ मध्ये झाली होती. प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात यावी. कच्चा आराखडा तयार होताच तत्काळ ई-मेलद्वारे पाठवावा, अशा सूचनाही राज्य निवडणूक आयोगाने दिल्या. प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा कार्यक्रम घोषित झाल्याने राजकीय हालचालींनीदेखील वेग घेतल्याचे दिसून येत आहे. प्रभागात आपली उमेदवारी कशी सक्षम राहिल, या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षातील इच्छुक आतापासूनच कामाला लागण्याची चिन्हे आहेत. 

एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार! यापूर्वी नगराध्यक्ष थेट जनतेतून आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धती अंमलात होती. महाविकास आघाडी सरकारने यामध्ये बदल केला असून, आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गतवेळी भारिप-बमसंने मारली होती मुसंडी !मागील पंचवार्षिक निवडणुकीत मानोरा, कारंजा व मंगरूळपीर येथे तत्कालिन भारिप-बमसंने मुसंडी मारली होती. वाशिम नगर परिषदेत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने भारिप-बमसंच्या उमेदवाराचा १५० च्या आसपास मताने पराभव करीत निसटता विजय मिळविला होता. पावणेपाच वर्षाच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय समीकरणेदेखील पार बदलून गेली आहेत. याचा कुणाला फटका बसणार आणि कुणाला लॉटरी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे राहिल. 

इच्छूक उमेदवार लागले कामाला नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत एका प्रभागात एक उमेदवार निवडून द्यावा लागणार आहे. संभाव्य निवडणूक लक्षात घेता इच्छूक उमेदवार आतापासूनच कामाला लागत आहे. प्रभागातील समस्यांचा आढावा घेत या समस्या सोडविण्यासाठी आपणच कसे प्रबळ दावेदार आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्नही होत आहे. विद्यमान सदस्य आणि पराभूत उमेदवार पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक