शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:12 IST

वाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात  तीन मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांतही सध्या अपेक्षीत जलसाठा नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता वाढत आहे. ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर अनेक गावातील विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या ४.३८ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात येत आहेत. विहिर अधिग्रहणासंदर्भात ८० पेक्षा अधिक प्रस्ताव आहेत तर टँकरसंदर्भात १५ प्रस्ताव आहेत. विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली नाही. परिणामी, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात प्रचंड गैरसोय होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात यंत्रणा गुंतलेली असल्याने पाणीटंचाई निवारणार्थच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. टँकरच्या प्रस्तावांना अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकºयांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे. गलमगाव येथे पाण्यासाठी झूंबडमानोरा तालुक्यातील गलमगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडी पडल्यामुळे गावातील एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासंदर्भात ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे सादर केलेला प्रस्ताव लालफितशाहीत अडकला आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीमधून तहसिल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नसल्याने गावकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याप्रमाणेच राजूरा परिसरातील राजूरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी आदी गावांमध्येही तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई