शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा संपली; आज सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:21 IST

Washim News सरपंच पदाचे आरक्षण काय निघणार, याकडे राजकीय क्षेत्रासह इच्छुकांचे लक्ष लागून आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यातील सन २०२०-२०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी जिल्ह्यातील सहाही तहसील स्तरावर २ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामुळे सरपंच पदाबाबतची प्रतीक्षा संपणार असून, आरक्षण सोडतीनंतर खऱ्या अर्थाने मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. सन २०२० ते २०२५ या काळात जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकीद्वारे नव्याने ग्रामपंचायतींचे कारभारी ठरतील. दरम्यान, जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी निवडणूक झाली. १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. यावर्षी आरक्षण सोडत प्रक्रियेत ग्रामविकास विभागाने बदल केले आहेत. दरवेळी निवडणुकीपूर्वी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत होती. यामुळे आरक्षित जागेवरून निवडणूक लढताना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्रासाठी काही जणांकडून चुकीच्या पद्धतीचा अवलंब होत असल्याची बाब निदर्शनात आल्याने, यंदापासून निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण काय निघणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. तालुकास्तरावर २ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण काय निघणार, याकडे राजकीय क्षेत्रासह इच्छुकांचे लक्ष लागून आहे. 

एस.सी., एस.टी. आरक्षण कायम राहण्याची शक्यताअनुसूचित जाती (एस.सी.) व अनुसूचित जमाती (एस.टी.) चे आरक्षण हे लोकसंख्येच्या             प्रमाणात असते. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढताना               २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी  एस.सी., एस.टी. प्रवर्गासाठी काढलेली आरक्षण सोडत ही लोकसंख्येवर आधारित असल्याने आणि २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येत कोणताही बदल नसल्याने एस.सी. व एस.टी.च्या आरक्षणात बदल होणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंच