शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल,  सहा लोकांवर गुन्हे दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 15:54 IST

सहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने शिवसेनच्या उमेदवाराला पांठीबादिल्याचा खोटा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी सहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सविस्तर असे की वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रदिप खंडारे यांनी रिसोड  पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद केले की रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडुन दिलीपराव जाधव हे निवडणुक लढवित आहेत. जाधव यांचे राजकीय विरोधक सोशल मिडीयावर दिशाभुल करणारे मॅसेज पाठवीत आहेत. सदर प्रकार हा शनिवार १९ ऑक्टोबरच्या रात्री पासुन सुरु आहे. सोशल मिडीयावर ०हायरल केलेल्या मॅसेजमध्ये मी वंचीत बहुजन आघाडीचा उमेदवार दिलीपराव जाधव  ओबीसी, दलीत,वंचित सर्व समाजाचा विचार करून मी शिवसेना,भाजपा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आश्रृजी सानप यांना जाहीर पांठीबा देत आहे. त्यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबुन आपले अमुल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा अशी खोटी पोस्ट दिलीप जाधव यांचे नाव टाकून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.  काही ग्रुपवर ही पोस्ट आल्याने सदर बाब ही तक्रारदाराच्या आजरोजी निर्दशनास आल्याने ग्रुपमध्ये पोस्ट टाकणारे सुनिल नागरे, अक्षय सानप, आकाश शिंदे, मंथन बंड, संतोष व नाव माहीत नसलेल्या या ७७४४९६८८९४ क्रंमाकाच्या मालका विरोधात तक्रार देण्यात आली. खंडारे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६०, लोकप्रतिनिधित्व १९५१ आणि १९८८, माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार कलम १७१- जी, १२३(४),६६ ड नुसार गुन्हे दाखल केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019risod-acरिसोडwashimवाशिमVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी