वाशिम: वॉटर कप स्पर्धेचा कालावधी संपण्याच्या स्थितीत असताना विविध ठिकाणी जलसंधारणाच्या कामाला वेग आला आहे. कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील ग्रामस्थ या स्पर्धेंतर्गत ३३ चौरस मीटर आकाराचे भव्य शेततळे श्रमदानातून खोदत आहेत.कारंजा तालुक्यातील ३० गावांत वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार मिळविण्यासाठी चढओढ सुरू झाली आहे. या स्पर्धेंतर्गत प्रशासनाकडून जलयुक्तच्या कामांना मंजुरी मिळताच श्रमदानासाठी गावकरी एकवटले आहेत. या स्पर्धेत गतवर्षी धनज बु. येथे गावकºयांचे श्रमदान आणि जेसीबीच्या सहाय्याने १०० चौरस मीटरचे भव्य शेततळे खोदण्यात आले होते. त्याचा फायदा आताही धनजवासियांना होत आहे. या कामापासून प्रेरणा घेत यंदा स्पर्धेत सहभागी झालेल्या कारंजा तालुक्यातील काही गावांतील ग्रामस्थ शेततळ्यांसाठी श्रमदान करण्यास उत्सूक असून, पिंप्री मोडक येथे ३३ चौरस मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी ग्रामस्थांनी खोदकामही सुरू केले आहे. सरपंच ललिता थोटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई जाधव यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्य आणि पुरुष मंडळी या शेततळ्यासाठी श्रमदान करीत आहेत. गावकºयांच्या उत्साहामुळे अवघ्या चार दिवसांत तब्बल ६ फुट खोल खोदकामही पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांतच हे शेततळे आकार घेणार आहे.
शेततळ्यासाठी पिंप्री मोडकवासिंयाचे उत्साहात श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 14:44 IST
वाशिम: वॉटर कप स्पर्धेचा कालावधी संपण्याच्या स्थितीत असताना विविध ठिकाणी जलसंधारणाच्या कामाला वेग आला आहे. कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील ग्रामस्थ या स्पर्धेंतर्गत ३३ चौरस मीटर आकाराचे भव्य शेततळे श्रमदानातून खोदत आहेत.
शेततळ्यासाठी पिंप्री मोडकवासिंयाचे उत्साहात श्रमदान
ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील ३० गावांत वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार मिळविण्यासाठी चढओढ सुरू झाली आहे. पिंप्री मोडक येथे ३३ चौरस मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी ग्रामस्थांनी खोदकामही सुरू केले आहे. सरपंच ललिता थोटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई जाधव यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्य आणि पुरुष मंडळी या शेततळ्यासाठी श्रमदान करीत आहेत.