शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

घाटा गावची वाट झाली बिकट; शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:42 IST

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगतीशिल शेतकऱ्यांचे तथा वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली असून शेतात पिकणारा माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेताना शेतकऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. असे असताना रस्त्याच्या तद्वतच अन्य स्वरूपातील विकासाच्या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाºया मालेगाव तालुक्यातील निवडक गावांमध्ये घाटा या गावाचा अग्रक्रम लागतो. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये या गावातील शेतकºयांकडून विक्रमी उत्पन्न घेतले जात आहे. सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी बहुतांश शेतकºयांनी शेततळे घेतल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतमालाच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे; मात्र शेतात पिकणारा माल बाजारपेठेत पोहचविण्याकरिता घाटा या गावाला पांगरखेडामार्गे शिरपूर अशा रस्त्याची उपलब्धी अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे विविध स्वरूपातील अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाटा ते पांगरखेडा फाट्यापर्यंत पक्की सडक उभारण्याची मागणी सरपंच फलांगा रमेश चव्हाण यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केली. घाटा या गावापासून पांगरखेडा फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक प्रयोगशिल शेतकºयांची शेती वसलेली आहे. तसेच पांगरखेडा फाट्यापासून काही अंतरावर नागपूर ते औरंगाबाद हा महामार्ग आहे. या फाट्यापासून शिरपूरमध्ये जाण्याकरिता केवळ चार किलोमिटरचे अंतर पार करावे लागते; मात्र हा रस्ता लालफितशाहीत अडकून असल्याने सद्या घाटा ते किन्ही घोडमोड आणि तेथून शिरपूर असे मोठे अंतर पार करावे लागत आहे. यामुळे विशेषत: शेतकºयांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभागFarmerशेतकरी