शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ध्यास ग्रामस्वच्छतेचा; माजी सरपंच गोळा करतात कचरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:09 IST

अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात.

- अमोल कल्याणकर मालेगाव (वाशिम): येथूनच जवळ असलेल्या अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात, तसेच कचºयाची स्वत:च विल्हेवाट लावतात. ग्रामस्वच्छतेचा त्यांचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे. अंचळ येथील कुंडलिक जनार्दन जुनघरे हे विद्यमान सरपंच संगीता जुनघरे यांचे पती आहेत. मात्र, सरपंच पती असल्याचा कुठलाच आर्विभाव ते दाखवित नाहीत. लहान वयातच पित्याने आत्महत्याब केल्यानंतर पितृछत्र हरविलेल्या कुंडलिक जुनघरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. उदरभरणासाठी आधार नसल्याने त्यांनी सुरुवातीच्या काळात मिळेल ते काम केले. फावल्या वेळेत जनतेची कामेही त्यांनी मोफत केली. त्यामुळे ते गावातील सर्वाचे आवडते व्यक्ती झाले. अशात त्यांच्याकडे गावचे सरपंच पद आले. मागील दोन पंचवार्षिक कालावधित त्यांनी हे पद भुषविले. सद्यस्थितीत त्यांच्या पत्नीकडे सरपंच पद आहे. पत्नी सरपंच असतानाही त्यांच्यात कसलाही अहंभाव निर्माण झाला नाही. गावच्या स्वच्छतेसाठी ते स्वत: कचरा संकलन करतात यातूनच त्यांचे साधे व्यक्तीमत्त्व दिसून येते.  गाव स्वच्छतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. एक दिवसही न चुकता गावातील सर्व कचरा संकलित करतात गावातील स्वत:  फिरूून ओला व सुका कचरा गोळ्या करुन गावाबाहेर त्याची विल्हेवाट लावतात  त्याशिवाय गावात स्वत:च धूर फवारणी करून गावात स्वच्छतेचा जागर ते करीत आहेत. सात सदस्य असलेल्या त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ३ कर्मचारी असतानाही अनेक वषार्पासून हे काम ते स्वत: करीत आहेत. त्यांच्या या कार्यात बळीराम वानखडे हेसुद्धा त्यांना तितक्याच नेटाने कोणताही मोबदला न घेता सहकार्य करत आहेत. स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी स्वत: जवळून पैसे खर्च करून वृक्षारोपण करतानाच ३०० वृक्षांना त्यांनी सुरक्षाकवच त्यांनी बसवले. या वृक्षांना ते स्वत: पाणी घालत आहेत. 

  गाव केले हागणदारीमुक्त कुंडलिक जुनघरे यांनी अंचळ या गावात शंभर टक्के शौचालय बांधण्यासाठी गावकºयांना प्रोत्साहित केले आणि ते काम त्यांच्याकडून करून घेतले. त्यामुळे आज गाव हागणदारी मुक्त झाले आहे. आजच्या परिस्थितीतही ते  स्वत: नित्यनेमाने स्वच्छता करतात त्यामुळेच गावातील उघड्यावरील शौचवारी बंद झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान