शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - शिक्षणाधिका-यांच्या कक्षात भरली वडपची शाळा

By admin | Updated: July 4, 2017 14:54 IST

ऑनलाइन लोकमत  राजुरा, दि. 4-  मालेगाव तालुक्यातील वडप येथील जिल्हा परिषद शाळेत १२० विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ तीनच शिक्षक असल्याने ...

ऑनलाइन लोकमत 

राजुरा, दि. 4-  मालेगाव तालुक्यातील वडप येथील जिल्हा परिषद शाळेत १२० विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात शाळा समितीसह ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिका-यांना निवेदन देवून शिक्षक भरण्याची मागणी केली होती. शिक्षक भरती न केल्यास आपल्या कक्षात शाळा भरविण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार ४ जुलै रोजी गटशिक्षणाधिका-यांच्या कक्षात वडपची शाळा भरविण्यासत आली.
 
मालेगाव पंचायत समिती अंतर्गंत येत असलेल्या वडप येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून एकूण पटसंख्या १२० आहे. या शाळेत एक मुख्याध्यापक व तीन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 
 
याकरिता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालु तुळशिराम गायकवाड, उपसरपंच  भगवान गोरख बोरकर, समाजसेवक सिताराम नामेदवराव कावळे, शाळा समिती सदस्य विनोद दत्तराव गायकवाड, गणेश नारायण जाधव, बालाजी सुभाष तटाले, गणेश देवबा बोरकर, रमेश पांडे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना २८ जून रोजी निवेदन देवून दोन शिक्षकांची नियुक्ती  ७ दिवसाच्या आत करण्यात यावी अशी मागणी करुन नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा व शाळा पंचायत समितीमध्ये भरविण्याचा इशारा दिला होता. 
 
सात दिवसाचा अवधी उलटून गेल्यानंतरही यावर कोणत्याच प्रकारची कारवाई न करण्यात आल्याने नागरिकांनी ४ जुलै रोजी गटशिक्षणधिका-यांच्या कक्षात शाळा भरविली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबधितांशी चर्चा व निवेदन देण्याकरीता त्यावेळी एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हते. शिक्षणाधिकारी सुटीवर तर विस्तार अधिकारी व ईतर अधिकारी मिटींगमध्ये असल्याचेसांगून भ्रमणध्वनी ठेवून दिला. त्यामुळे विद्यार्थी १० वाजतापासून कार्यालयातच बसून होते. याची वरीष्ठांनी दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
https://www.dailymotion.com/video/x84571u