शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दीड एकरात फुलविली संकरित आंब्यांची आमराई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 15:48 IST

अवघ्या दीड एकर क्षेत्रात संकरित आंब्यांच्या दीडशे झाडांची लागवड करून आमदाई फुलविण्याची किमया मंगरुळपीर येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र इंगोले यांनी केली आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधित या आमराईतून त्यांनी उत्पन्नही घेणे सुरू केले आहे.

वाशिम - अवघ्या दीड एकर क्षेत्रात संकरित आंब्यांच्या दीडशे झाडांची लागवड करून आमदाई फुलविण्याची किमया मंगरुळपीर येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र इंगोले यांनी केली आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधित या आमराईतून त्यांनी उत्पन्नही घेणे सुरू केले आहे. केवळ पावसाच्या भरवशावर अवलंबून न राहता वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेण्यात मंगरुळपीर येथील शेतकरी महेंद्र इंगोले यांचा हातखंडा आहे, केळी, निंबू, डाळींब, टरबुजाचे विक्रमी उत्पन्न त्यांनी आजवर घेतले आहे. तालुक्यातील खेर्डा खु. येथील शेतीत त्यांनी आता नवा प्रयोग केला असून, तो चांगलाच यशस्वी ठरत आहे. त्यांनी या शेतीत संकरित आंब्याच्या दीडशे झाडांची लागवड १५ महिन्यांपूर्वी केली. यामध्ये प्रामुख्याने जम्बो केशर आणि बारमाही या जातींचा समावेश आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे या झाडांची झपाट्याने वाढ झाली. लागवडीच्या वेळी दोन फुट उंच असलेली ही आंब्याची झाडे आता पाच ते सहा फूट उंच आणि भरदार झाली असून, त्यांना फळधारणाही होत आहे. यातील बारमाही जातीच्या झाडाला वर्षातून दोन वेळा फळधारणा होते. फळ आकाराने गोल आणि मोठे असून, आंबटपणा क मी असला तरी, चवीला चांगले असल्याने या फळांना मागणीही चांगली असते. जम्बो केशर हे केशर प्रकारातील आंबा फळ असून, या आंब्याचा आकाराही मोठा असतो. चवीने मधूर असलेले या फळाला मागणी आहे. महेंद्र इंगोले प्रायोगिक तत्त्वावर आंब्याची स्थानिक बाजारात विक्री करीत असले तरी, पुढे उत्पादनात वाढ करून या फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करून अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा मानस आहे.

टॅग्स :MangoआंबाagricultureशेतीFarmerशेतकरीwashimवाशिम