शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांच्या पडताळणीचे अहवाल प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:29 IST

तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी विभागाच्या सुचनेनुसार यंदाच्या हंगामात न उगवलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना तातडीने बदलून द्यावे लागणार आहे. तथापि, आठवडा उलटून गेला तरी, तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. शिवाय, त्यातच अद्यापही न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाचा गोंधळ उडत आहे.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पाहणी करीत आहेत. आता या संदर्भात विशेष नमुन्यात अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करावा लागणार आहे; परंतु कृषी विभागाची पाहणीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अहवाल प्रलंबित आहे.

शेतकºयांसह कंपनीलाही अहवालजिल्ह्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, किती क्षेत्रावर बियाणे उगवले नाही. बियाणे न उगवण्याच कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल संबंधित शेतकरी आणि बियाणे उत्पादक कंपनीलाही सादर करावा लागणार आहे. बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकरी त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याशिवाय शासनस्तरावर सादर करण्यासाठीही एक सर्वकश अहवाल तालुकास्तर समितीला तयार करावा लागणार आहे.

न उगवलेल्या बियाण्यांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्याच अहवाल तयार करीत आहेत. जिल्ह्यात वाढत असलेल्या तक्रारींमुळे ही प्र्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. शिवाय अहवालाची प्रक्रिया अत्यंत बारकाईने पूर्ण करावी लागणार आहे.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

 

टॅग्स :FarmerशेतकरीwashimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र