शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना मिळणार स्टिकर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:49 IST

अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात नियंत्रण कक्ष २६ मार्चपासून सुरू केला आहे.

ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्ष आहे. सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनांना परिवहन विभागामार्फत स्टिकर्स उपलब्ध करून देण्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात सुरू झाली असून,  जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीविषयी वाहतूकदारांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात नियंत्रण कक्ष २६ मार्चपासून सुरू केला असून, हा कक्ष २४ तास सेवेत राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी दिली.जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनांना परिवहन विभागामार्फत स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत वाहतूकदारांच्या झालेल्या बैठकीत २५ मार्च रोजी घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतुकदारांनी स्टिकर्स प्राप्त करून घेवून आपल्या वाहनांच्या दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाºया वाहतूकदारांना संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडून स्टिकर्स पुरविली जाणार आहेत. वाहनाच्या चालकांना तसेच माल भरणारे, उतरविणारे कामगार यांना, त्यांच्या घरापासून वाहनापर्यंत तसेच वाहतुकीचे काम पूर्ण झाल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी जर एखादी जीप, कार अशा वाहनांचा वापर वाहतूकदार करीत असतील तर या वाहतुकीला सुद्धा अत्यावश्यक सेवा समजून त्यासाठी स्टिकर्स दिले जातील. या संदर्भात वाहतुकदारांनी अशा चालकांना, कामगारांना ओळखपत्र पुरवावे किंवा संघटनेच्या लेटरहेडवर अशा व्यक्तींची नावे नमूद करून सदर वाहनात ठेवावीत. या वाहतुकीसाठी परिवहन अथवा पोलीस विभाग आवश्यक सहकार्य करणार आहे. ज्या गोदामांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात आला आहे, अशा गोदामांपर्यंतची किंवा गोदामापासून बाहेर जाणारी वाहतूक देखील आवश्यक वाहतूक समजण्यात येईल व या संदर्भाने आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसंदर्भात वाहतूकदारांना काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्ष किंवा या कक्षातील ८६६८८४४७०० व ७७०९३५८७७७ या क्रमांकावर साधावा, असे आवाहन सय्यद यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस