शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन विक्रीसाठी एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 15:26 IST

बाजार समितीच्या फाटकापासून तब्ब्ल एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागत असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : अवकाळी पाऊस थांबल्यानंतर सोयाबीच्या खरेदीला बाजार समित्यांत वेग आला आहे. त्यातच सोयाबीनला चांगले मिळत असल्याने मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. बाजार समितीत सोयाबीनच्या मोजणीसाठी नंबर लावण्यासाठी रात्री १२ वाजतापासूनच बाजार समितीच्या फाटकापासून तब्ब्ल एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागत असल्याचे दिसत आहे.गेल्या महिनाभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दानादान उडवली. शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच राहील्याने मोठ्या अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागला, त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हाती आलेले सोयाबीन ओले व काळे पडले; परंतु गेल्या पंधरा दिवसात वातावरणात बदल झाल्याने शेतकºया्ंनी सोयाबीन विक्रीची लगबग सुरू केली आहे. त्यामुळे बाजार समितीत मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मानोरा बाजार समितीत ताबडतोब पैशाचे व्यवहार होत असल्यामुळे बाहेरील या बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत असून, दररोज चार ते पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक या बाजारात होत असल्याचे चित्र दिसत आहे. बाजारात सोयाबीनची आवक वाढल्यामुळे मोजणीला विलंब लागत आहे. यासाठी अनेक शेतकरी आदल्या दिवशी रात्रीच बाजार समितीच्या फाटकासमोर रात्री १२ वाजता पासून आपलीवाहने उभी करीत आहेत. बाजार समितीत शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या गेटपासून ते विठोली रोडवर असलेल्या बुलडाणा अर्बनच्या गोडाऊनपर्यंत सोयाबीन वाहनाच्या रांगा पोचल्या होत्या. आलेल्या सोयाबीनचे मोजजाप रात्री उशिरापर्यंत चालु राहते. त्यामुळे परतीसाठी शेतकºयांवर मुक्काम करण्याची पाळी येत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीनही मानोºयातगेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. शासनाकडून सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषीत करण्यात आले असताना बाजारात त्यापेक्षा अधिक दराने चांगल्या सोयाबीनची खरेदी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा बाजार समितीतही ही स्थिती पाहायला मिळत असून, हा तालुका यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरच असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पुसद, आर्णि, दारव्हा आदि तालुक्यातील सोयाबीन उत्पादक मानोरा बाजार समितीत आपले सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणत आहेत. सोयाबीनच्या वाढत्या आवकीमुळे परिसरात दिवसरात्र रेलचेल पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराFarmerशेतकरी