शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी धोपे कुटुंबियांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:50 IST

सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा येथील रहिवासी तथा मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत सुनील विठ्ठलराव धोपे (३७) हे १५ सप्टेंबर  २०१८ रोजी कर्तव्यावर असताना सकाळच्या दरम्यान संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कारवाई व्हावी, सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.सुनील धोपे यांचे पार्थिव १७ सप्टेंबर २०१८ रोजी कारंजात आणले होते. धोपे यांची हत्या झाल्याचा आरोप करून धोपे कुटुंबीयांनी त्यास कारणीभूत असणाºया सीमा सुरक्षा दलातील पाच अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्या लावून धरल्या होत्या. अन्यायाच्या विरोधात १८ ते २१ सप्टेंबर २०१८ पर्यंत कारंजा बंदची हाकही दिली होती. याप्रकरणी कारंजा पोलिसांत ‘झीरो एफआयआर’अंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या संबंधित पाच अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण सिलाँग पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग केले होते. तेव्हापासून आतापर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कोणतीही ठोस कार्यवाही नसल्याचा आरोप करीत मृतक सुनील धोपे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई धोपे, पत्नी सविता धोपे यांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. याप्रकरणी सीबीआय किंवा चौकशी पथक नियुक्ती करून निष्पक्ष चौकशी करावी, दोषींना शिक्षा करण्यात यावी, कारवाई करण्यास विलंब का झाला याकरिता योग्य ती माहिती देण्यात यावी, दोषी अधिकारी व कर्मचारी मोठया पदावर असल्यामुळे अद्याप त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, परत शवविच्छेदन करण्याची धोपे कुटुंबियांची मागणी फेटाळण्यात का आली, सुनील यांना शहीद जवानाचा दर्जा देण्यात यावा, धोपे कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, कारंजा लाड येथे जागा देवून मृतक सुनील यांचा पुतळा उभारण्यात यावा आदी मागण्या यावेळी धोपे कुटुंबियांनी केल्या. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी लक्ष्मीबाई धोपे, सविता धोपे, सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव, आरटीआय कार्यकर्ते विनोद जाधव आदींनी केली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनKaranjaकारंजा