शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आगारात आदेश डावलून कर्मचाऱ्यांचा इतर कामासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:40 IST

महामंडळाची आर्थिक हानी करून लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचा प्रकार अकोला विभागातील वाशिम आगारात घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रा. प. महामंडळाचे (एसटी) महाव्यवस्थापक (वाहतूक) यांचे आदेश डावलत लिपिक कमतरेचे कारण समोर करून वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक या कामगारांकडून विशिष्ट मासिक हप्ता घेऊन त्यांचा इतरत्र वापर करीत महामंडळाची आर्थिक हानी करून लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचा प्रकार अकोला विभागातील वाशिम आगारात घडला आहे. या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रारही करण्यात आली आहे.एसटी महामंडळातील विविध विभागांतर्गत कार्यरत वाहतूक नियंत्रक, वाहक, चालक यांचा इतरत्र वापर करू नये, असे परिपत्रक एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी जारी केले आहे. तथापि, या परिपत्रकातील आदेशाची अधिकाऱ्यांनी पायमल्ली करून एसटीच्या अकोला विभागातील वाशिम आगारात लिपिक कमतरतेचे कारण समोर करून डीओर, एबीसी, कॅश अ‍ॅण्ड इश्यूसह इतर कामांसाठी वाहतूक नियंत्रक, वाहक, चालक आदि कामगारांचा अवाजवी वापर करून गैरप्रकार करीत एसटी महामंडळाची लाखो रुपयांची हानी केल्याचा प्रकार घडला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. यात २ मे २०१९ ते १७ मार्च २०२० पर्यंत ११ महिन्यांच्या कालावधित एकूण २६६ चलनीय कर्मचाºयांचा अवाजवी वापर करून महामंडळाचे ६८ लाख ४ हजार ९१३ रुपये वेतनापोटी अधिकाºयांनी खर्ची घातले आहेत. या प्रकरणी अकोला येथील विजय मालोकार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली आहे.वेतनातील ३० टक्के रकमेच्या बोलीवर कर्तव्यवाहतूक नियंत्रक, वाहक, चालकांना इतरत्र वापर करण्यावर महाव्यवस्थापक (वाहतूक) यांचे आदेश असताना वाशिम आगारातील अधिकाºयांनी वरिष्ठांच्या सहकार्याने आपल्या मर्जीतील कर्मचाºयांचा वापर करून महाव्यवस्थापकांच्या आदेशाची पायमल्लीच केली नाही, तर या कर्मचाºयांकडून वेतनातील ३० टक्के रक्कम घेतल्याची चर्चा आगारातील काही कर्मचाºयांत होत असून, त्यासाठी विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतुक अधिकाºयांनी वेळोवेळी वाशिम आगाराला भेटी दिल्याचीही चर्चा कर्मचाºयांत आहे.

वाशिम आगारात कर्मचाºयांचा तुटवडा असताना आवश्यकतेनुसार कर्मचाºयांना जबाबदारी देण्यात आली. कुठलाही गैरप्रकार करण्यात आलेला नाही. तथापि या प्रकरणाची चौकशी होवून सत्य समोर येईलच. त्यामुळे आम्ही सध्या याबाबत अधिक काही सांगू शकणार नाही.- विनोद इलामे,आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी