शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार

By दिनेश पठाडे | Updated: November 27, 2023 21:46 IST

एका व्यक्तीचा मृत्यू; ९० मेंढ्यांही दगावल्या

वाशिम : जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा बसला असून कपाशी जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. दरम्यान, वस्तूनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर नुकसानाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 

रविवारच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानाचा  प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश अमरावती  विभागीय आयुक्त कार्यालयाने २७ नोव्हेंबरला दिले होते. त्यानुसार तातडीने जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ५०.५ मीमी पावसाची नोंद झाली असून काही मंडळात अतिवृष्टी तर इतर मंडळात अवकाळी पाऊस बरसला. वाशिम तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार ४५२ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. तर एका घराची अंशत: पडझड झाली. त्याचप्रमाणे प्रकाशराव त्र्यंबकराव सरनाईक(रा. देऊळगाव बंडा, ता.रिसोड) यांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण समजू शकले नसल्याचे  प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तसेच मंगरुळपीर तहसील कार्यालयांतर्गत ४१, कारंजा ३५, मानोरा १४ अशा ९० मेंढ्यांचा तर जिल्ह्यात एका मोठ्या जनावराचा मृत्यू झाल्याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा  प्रशासनास सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला त्यानुसार हा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास  पाठविण्यात आला.  मेंढ्याच्या मृत्यूंची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

नुकसानाचे क्षेत्र वाढणारजिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल सादर केला असला तरी प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेल्या मंडळासह इतर भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची स्थिती आहे. सोमवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे पंचनामे व इतर कामे करण्यास अडचण निर्माण झाली. मात्र, पुढील काही दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एकूण सर्व तालुक्यांतील नुकसानाची स्थिती समोर येणार आहे. तेव्हाच नेमकी कोणत्या तालुक्यात कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिम