शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘अनलॉक-४’: अर्थव्यवस्थेला मिळतेय उभारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 13:03 IST

साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याच्या सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मिशन बिगीन अगेनअंतर्गत ‘अनलॉक-४’ची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून सुरू झाली. सकाळपासून सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजत असून, अर्थव्यवस्थेलाही उभारी मिळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून उमटत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारपेठेत वावरताना व्यापाऱ्यांसह नागरिकांनीदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.साधारणत: मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाली. सुरूवातीच्या काळात जवळपास दीड महिना अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने, व्यवसाय ठप्प होते. जून महिन्यापासून ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली तसेच रेस्टॉरन्ट, हॉटेल, खासगी प्रवाशी वाहतूकही सुरू झाली.सर्वच शहरांमधील बाजारपेठेत विविध वस्तू, साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याच्या सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे.खासगी प्रवासी वाहतूक सुसाट२२ मार्चपासून ठप्प असलेली खासगी प्रवासी वाहतूक २ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यामुळे खासगी वाहनधारकांना दिलासा मिळाला असून, चालक, वाहक व कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला. ग्रामीण भागातही खासगी प्रवाशी वाहतूक सुसाट असून, प्रवाशांनाही वाहनाची सुविधा उपलब्ध झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव; प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक‘अनलॉक-४’च्या टप्प्यात एकिकडे अर्थव्यवस्थेला उभारी मिळत आहे तर दुसरीकडे याच काळात सहा दिवसात नव्याने ४०९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणेही आवश्यक ठरत आहे. अन्यथा परिस्थिती चिंताजनक बनण्यास फारसा वेळ लागणार नाही.

‘अनलॉक-४’च्या टप्प्यात बºयाच अंशी शिथिलता मिळाली. दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढली. ग्राहकांची गर्दी पाहता, अर्थचक्राला उभारी मिळत आहे. दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंताही कायम आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.- मनिष मंत्री,जिल्हा सचिव, व्यापारी मंडळ वाशिम

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकwashimवाशिम