दोन सख्ख्या बहिणींना फूस लावून पळविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 04:36 PM2020-06-02T16:36:45+5:302020-06-02T16:45:34+5:30

अज्ञात आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशनला २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

Two sisters were tricked and kidnapped | दोन सख्ख्या बहिणींना फूस लावून पळविले 

दोन सख्ख्या बहिणींना फूस लावून पळविले 

Next
ठळक मुद्दे२० वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन मुलींना फूस लावून पळवून नेले. शोध घेतला असता, कुठेही आढळून आल्या नाहीत. अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री बु. येथील दोन सख्ख्या बहिणींना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १ जून रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशनला २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंप्री बु. येथील फिर्यादिने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, फिर्यादीच्या २० वर्षीय मुलीस पाहण्याकरिता पाहुणे आले होते. १ जूनच्या  सकाळी दहा वाजता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या २० वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन मुलींना फूस लावून पळवून नेले. १ व २ जून रोजी त्यांचा शोध घेतला असता, कुठेही आढळून आल्या नाहीत. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून  मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Two sisters were tricked and kidnapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.