शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बसच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:33 IST

याचवेळी मागून येत असलेल्या एस.टी. बसच्या चाकाखाली दुचाकी गेल्याने एकजण जागीच ठार झाला; तर दुसºयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कारंजा लाड : रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकीसमोर अचानकपणे आलेल्या कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी वाहनचालकाने करकचून ब्रेक मारला. यामुळे वाहन स्लीप झाले. दुर्दैवाने याचवेळी मागून येत असलेल्या एस.टी. बसच्या चाकाखाली दुचाकी गेल्याने एकजण जागीच ठार झाला; तर दुसºयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कारंजा-दारव्हा मार्गावरील विद्यूत उपकेंद्रानजिक २९ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, प्रकाश सदाशिव ठक (वय ५० वर्षे, रा. रामगाव रामेश्वर) आणि मुस्तफा खान लियाकत अली खान (वय ४५ वर्षे, रा. गरीब नवाज कॉलनी, कारंजा) हे दोघेजण एम.एच. २९ डी ९५९५ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने कारंजाकडून दारव्हा कडे जात होते. यादरम्यान कारंजा-दारव्हा मार्गावरील विद्यूत उपकेंद्रानजिक अचानक कुत्रा आडवा आल्याने वाहनचालकाने करकचून ब्रेक मारल्याने दुचाकी वाहन स्लीप झाले. याचवेळी मागून येणाºया एम.एच. ०६ एस ८९२७ या क्रमांकाच्या अकोला-पांढरकवडा या एस.टी.बसच्या चाकाखाली वाहन गेल्याने प्रकाश ठक हे जागीच ठार झाले; तर मुस्तफा खान गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मानव सेवा हेल्पलाईनच्या सदस्यांनी तातडीची पाऊले उचलत गंभीर जखमीस उपचाराकरिता अमरावतीला हलविले; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून बसच्या चालकाविरूद्ध भादंविचे कलम ३०४ ‘अ’, २८७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गजानन ढिसळे करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात