शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:14 IST

कामरगाव ते खेर्डादरम्यान मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसºया जखमीचा उपचारादरम्यान अमरावती येथे मृत्यू झाला.

ठळक मुद्देदिलीप घोडे व विकास डुकरे अशी मृतकाची नावे आहेत.कामरगावकडे येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये दिलीप घोडे यांचा जागीच मृत्यु झाला तर जखमी अवस्थेत विकास डुकरे याला अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव (वाशिम) : गणपती विसर्जन मिरवणुक आटोपल्यानंतर खेर्डा येथे कामानिमित्त गेलेले युवक परत कामरगावकडे येत असताना २५ सप्टेंबरला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास कामरगाव ते खेर्डादरम्यान मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसºया जखमीचा उपचारादरम्यान अमरावती येथे मृत्यू झाला. दिलीप घोडे व विकास डुकरे अशी मृतकाची नावे आहेत.२५ सप्टेंबर रोजी कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील गणपती विसर्जन मिरवणुक होती. सायंकाळच्या सुमारास सदर मिरवणूक आटोपून काही कामानिमित्त दिलीप माणिकराव घोडे (५०) व विकास किसनराव डुकरे (२५) दोघेही रा. कामरगाव हे एम.एच.३७ एक्स. ३५२२ क्रमांकाच्या मोटारसायकलने खेर्डा येथे गेले होते. रात्री १२.३० वाजतादरम्यान परत कामरगावकडे येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये दिलीप घोडे यांचा जागीच मृत्यु झाला तर जखमी अवस्थेत विकास डुकरे याला अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान विकास डुकरे याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी सागर दिलीप घोडे यांच्या फिर्यादीनुसार निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने मृतक विकास डुकरे याचेविरूद्ध भादंवी कलम २७९, ३३७, ३०४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक  सोनाली गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम,जमादार राजगुरे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात