शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेतील आरोपीकडून आणखी दोन तलवारी जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 16:45 IST

शे. सोहील शे. खाँजा या आरोपीच्या घरातून पोलिसांनी आणखी दोन तलवारी जप्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील पुसद रस्त्यावरील रेल्वेगेटनजिक एका इसमावर प्राणघातक हल्ला करणाºया शे. सोहील शे. खाँजा या आरोपीच्या घरातून पोलिसांनी आणखी दोन तलवारी जप्त केल्या. आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता, २६ फेब्रूवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक योगीता भारव्दाज यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी, की पुसद रस्त्यावरील रेल्वेगेटनजिक क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात काशीनाथ वैद्य (रा. कळंबा महाली, ता. वाशिम) यांना एम.एच. ०४ सी.डब्ल्यू. २०२० या क्रमांकाच्या चारचाकी वाहनात बसून असलेल्या चौघांनी शिविगाळ करून मारहाण केली. त्यातील एकाने वाहनातील तलवार काढून वैद्य यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी व पोलिस कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ घडला नाही. त्यानंतर पोलिसांनी वाहनचालक शे. सोहील शे. खाँजा यास वाहन व त्यातील दोन तलवारींसह अटक केली; तर अन्य तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक असलेल्या आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, घरी आणखी दोन तलवारी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्या तलवारी देखील पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान, आरोपी शे. सोहील शे. खाँजा यास न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यास २६ फेब्रूवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तपास वाशिम शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल मानेकर करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी