शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेलगाव येथे दोन गटात हाणामारी ; २ जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:21 IST

शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील शेलगाव  राजगुरे येथे ३० मे रोजी सायंकाळी उशिरा एकाच समाजातील दोन गटात हाणामारीची घटना घडली.

ठळक मुद्देआरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपाने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यांच्यावर अकोला येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत तर भगवान वाघ हे जखमी आहेत. दोन्ही गटातील ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील शेलगाव  राजगुरे येथे ३० मे रोजी सायंकाळी उशिरा एकाच समाजातील दोन गटात हाणामारीची घटना घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून परस्परविरोधीतक्रारी वरून एकूण  १६ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

शिरपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेलगाव राजगुरे येथील फिर्यादी श्यामसुंदर नारायणराव वाघ यांनी पोलिसात तक्रार दिली की जुने भांडण व शेत जमिनीच्या मोजणी कारणाहून संतोष नारायणराव वाघ, फिर्यादी व त्यांच्या भावांना आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपाने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात संतोष वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत तर भगवान वाघ हे जखमी आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अभंग किसनराव वाघ, दिलीप लक्ष्मणराव वाघ, शिवाजी बाबाराव वाघ, वसंतराव  बाबाराव वाघ, सौरभ किसनराव वाघ, वैभव दिलीपराव वाघ, किसन बाबाराव वाघ, बाबाराव केशवराव वाघ यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३०७,  ३२४, १४३, १४७,  १४८, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसºया गटामध्ये फिर्यादी दिलीप एकनाथराव वाघ यांनी तक्रार दिली की जुने भांडण तथा शेतजमिन मोजणीच्या वादावरून आरोपीनी संगनमत करून  फिर्यादी व त्यांच्या घरातील लोकांना काडया, दगड व लोखंडी पाईपने मारहाण केली व अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व घरा पुढील इंधन  पेटवून दिले. सदरच्या तक्रारीवरून श्यामसुंदर नारायण वाघ, संतोष नारायण वाघ, भगवान नारायण वाघ, ऋषीकेश शामसुंदर वाघ, सुमित शामसुंदर वाघ, स्वप्निल मनोहर वाघ, मनोहर वाघ  व चार महिला विरुद्ध कलम ३२४, १४३, १४७, १४८,१४९,२९४, ४३५, ५०४,५०६ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनCrimeगुन्हा