शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा हळद, मक्यासह भाजीपाला पिकांना फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:50 IST

वाशिम/रिसोड : गत तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/रिसोड : गत तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे. रिसोड तालुक्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील हळद व मक्याची झाडे करपली असून, अन्य तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.सिंचनाची सुविधा उपलब्ध असणारे जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा या पारंपारिक पिकांबरोबरच हळद, मका व भाजीपालावर्गीय पिकेही घेतात. जिल्ह्यात दोन हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर हळद लागवड झालेली आहे. रिसोड तालुक्यात वाकद परिसर, मालेगाव तालुक्यात शिरपूर परिसरात हळदीचे लागवड क्षेत्र अधिक आहे. रब्बी हंगमात मका पीक देखील घेतले जाते. साधारणत: गत आठवड्यापर्यंत पोषक हवामान असल्याने हळद व मका या दोन्ही पिकांना ‘अच्छे दिन’ होते. परंतू, शनिवार, २९ डिसेंबरपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका या पिकांना जबर फटका बसला आहे. वाकद भाग दोनमधील हळद पिक दोन दिवसात करपून गेले आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हतबल झाले असून, कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी होत आहे. रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील शेतकरी बळीराम कुल्हाळ यांच्या शेतातील खरबूज पीकही थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. कुल्हाळ यांनी आधुनिक पद्धतीने शेतीची कास करून प्लास्टिक आच्छादनावर हे पीक घेतले होते. परंतु गत तीन दिवसात थंडीचा कडाका वाढल्यामुळे हे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. सदर पिकासाठी त्यांनी एकलासपूर धरणावरून पाईपलाईन सुद्धा केलेली आहे. वाकद तसेच एकलासपूर परिसरात शेडनेटमधील मिरची तसेच सिमला मिरची यासारखी पिके सुद्धा कोमेजून गेली आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक शेतकºयांचे वांगे, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसला आहे. आणखी दोन ते तीन दिवस थंडीचे प्रमाण  असेच राहिले तर हळद, मका यासह भाजीपालावर्गीय पिके संपूर्णत: हातातून जाण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. वाकद येथील शेतकरी विजय जटाळे यांनी शेडनेटमध्ये घेतलेले मिरचीचे पीक थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. जटाळे यांचा हा मिरचीचा ‘बिजवाई प्लॉट’ असल्यामुळे त्यांना खूप मेहनत करावी लागली आहे. नैसर्गिक संकटामुळे मिरचीचे नुकसान होत असल्याने शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी जटाळे यांनी केली. कडाक्याच्या थंडीत मका, हळद तसेच काही भाजीपालावर्गीय पिके तग धरू शकत नाहीत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडagricultureशेतीFarmerशेतकरी