लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील शिरपूर परिसरात हळदीचे सर्वाधिक उ्त्पादन होत असून, सध्या हळदीला सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. पारंपारिक शेतीबरोबरच शिरपूर परिसरातील शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. फळबाग व भाजीपाला लागवडीबरोबरच हळद लागवडही केली जाते. सन २०१५-१६ या वर्षापासून शिरपूर परिसरातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले. कृषी विभागाच्या सल्ल्यातून दरवर्षी हळद लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येते. सन २०१७-१८ या वर्षात तर शिरपूरसह मालेगाव तालुक्यात चार हजार पेक्षा अधिक हेक्टरवर लागवड झाली होती. आता नवीन हळद बाजारात आली असून, सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. शिरपूर येथे एका ठिकाणी हळद खरेदी केली जात असून, प्रत्येक बाजार समितीत हळद खरेदी सुरू होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हळदीला हमीभाव असला तरी हमीभावानुसार खरेदी होत नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा पडते. उत्पा दन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.
हळदीला प्रती क्विंटल सात हजार रुपये दर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 17:40 IST
मालेगाव : तालुक्यातील शिरपूर परिसरात हळदीचे सर्वाधिक उ्त्पादन होत असून, सध्या हळदीला सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे.
हळदीला प्रती क्विंटल सात हजार रुपये दर !
ठळक मुद्दे शिरपूर परिसरात फळबाग व भाजीपाला लागवडीबरोबरच हळद लागवडही केली जाते. शिरपूरसह मालेगाव तालुक्यात चार हजार पेक्षा अधिक हेक्टरवर लागवड झाली होती. आता नवीन हळद बाजारात आली असून, सात हजार रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे.