शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तूर, हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतकरी हताश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:55 IST

वाशिम: पश्चिम वऱ्हाडात तिन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तूर आणि हरभऱ्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पश्चिम वऱ्हाडात तिन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तूर आणि हरभऱ्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. त्यात हरभऱ्याची खरेदी हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दराने, तर तुरीचीहमीदरापेक्षा जवळपास ४०० रुपये कमी दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. पश्चिम वऱ्हाडातील ११ निवडक बाजार समित्यांत मिळून तुरीला सरासरी ५१६७ रुपये क्विंटल, तर हरभऱ्याला सरासरी ४२८५ रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले.पश्चिम वºहाडात खरीप हंगामात २.३० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची, तर रब्बी हंगामात २.२० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात हरभºयाची पेरणी झाली. बुलडाणा जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी स्थितीमुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादनावर बराच परिणाम झाला. तर वाशिम, अकोल्यातही काही भागांत दुष्काळी स्थितीमुळे या पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. खरीपातील दीर्घकालीन पीक असलेली तूर आणि रब्बी हंगामातील हरभºयाची खरेदी आता बाजारात जोरात सुरू आहे. तथापि, या दोन्ही शेतमालाच्या दरात सतत घसरण होत आहे. शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रति क्विंटल, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी पश्चिम वºहाडातील ११ बाजार समित्यांतील दराची सरासरी काढल्यानंतर तुरीची खरेदी प्रति क्ंिवटल अधिकाधिक ५१६७ रुपये दराने, तर हरभºयाची खरेदी अधिकाधिक ४२८५ रुपये क्विंटल दराने झाल्याचे दिसून आले. अर्थात पश्चिम वºहाडात व्यापाºयांकडून तुरीची ५०० रुपये कमी दराने, तर हरभºयाची ४०० रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने पश्चिम वºहाडातील शेतकरी पिचून गेला असताना बाजार व्यवस्थेकडूनही शेतकºयाला दिलासा मिळत नसल्याने तो पुरता हताश झाला आहे. चार बाजारात हरभºयाला हमीपेक्षा अधिक दरपश्चिम वऱ्हाडातील ११ बाजार समित्यांत सरासरी तूर आणि हरभºयाची खरेदी अनुक्रमे ५१६७ आणि ४२८५ रुपये प्रति क्विंटल दराने होत असली तरी, यातील दोन बाजार समित्यांत मात्र हरभºयाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याचे शुक्रवारच्या खरेदीतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि वाशिम जिल्ह्यातील मालेगाव बाजार समितीत व्यापाºयांकडून ४८०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. त्याशिवाय शेगाव येथील बाजार समितीतही शुक्रवारी ४६०० रुपये प्रति क्विंटल दराने व्यापाºयांनी हरभºयाची खरेदी केली. अर्थात शेगाव येथेही शेतकºयांना समाधानकारक दर मिळाले. इतर आठ बाजार समित्यांत मात्र शेतकºयांची घोर निराशाच झाली.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमFarmerशेतकरी