शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:45 IST

चालकाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

कारंजा लाड : सिमेंटने भरलेला ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर औरंगाबाद दृततगती मार्गावरील तपोवन फाट्याजवळ १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. ३८ वर्षिय नबी हसन खॉर्  रा. तिरकी बाजार जिल्हा गया (बिहार ) असे मृत्यू झालेल्या क्लिनरचे नाव आहे. एम .एच. ३४ बीजी ९४५१ क्रमांकाचा लक्ष्मी ट्रान्सस्पोटर््सचा सिमेंटने भरलेला ट्रक चंद्रपूरहून समृध्दी महामागार्साठी सिमेंट घेवून मालेगाव समोरील ईराळा प्लंँटवर जात असतांना मार्गातील तपोवन फाट्याजवळ विहिरीत पडला. सदर ट्रक रस्त्यातच बिघाड झाल्याने चालू बंद होत होता. त्यामुळे ट्रकचालकाने क्लिनरला ट्रकच्या बॅटरीचे वायर तपासण्यास सांगितले. वायर तपासत असतांनाच अचानक ट्रक चालू झाला व पुढे जावून एका झाडावर धडकला. यावेळी क्लिनर टँकची कॅबिन व झाड याच्यामध्ये अडकला होता. तेव्हा चालकाने आरडाओरड केल्याने जवळपासच्या शेतातील शेतकरी व मजूर घटनास्थळी धावले व क्लिनरला वाचविण्याचे त्यांनी प्रयत्न केले,  परंतु अपघातग्रस्त ट्रकमध्ये ३०  टन सिमेंट असल्याने झाड तुटले व ट्रक क्लिनरसह विहिरीत पडला. त्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जमलेल्या शेतकºयांनी घटनेची माहिती कारंजा ग्रामीण पोलीसांना दिल्याने ठाणेदार इंगळे यांनी आपल्या सहकाºयासमवेत घटनास्थळी धाव घेतली व ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९  मे रोजी पहाटे ४ वाजता रेस्क्यु आॅपरेशन टिम व गा्रमीण पोलीसांना ट्रकचे चेसीज व क्लिनरचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. १९ मे रोजी मृत्यू पावलेल्या क्लिनरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शेंबाडे यांनी दिली. तर टँकर बाहेर काढण्याचे काम वृत्तलिहेस्तोवर  सुरू होते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात