Truck driver dies by touching electric wires | विजेच्या तारांना स्पर्श होऊन टिप्पर चालकाचा मृत्यू
विजेच्या तारांना स्पर्श होऊन टिप्पर चालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) - खंडाळा शिंदे येथे टिप्परमधून रेती खाली करीत असताना हायड्रोलिक ट्रॉलीचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन टिप्पर चालक गणेश केशवराव देशमुख (३०) रा. देवठाणा ता. मंठा जि. जालना हा जागेवरच ठार झाला. 
 गणेश केशवराव देशमुख हा टिप्पर चालक १६ एप्रिल रोजी टिप्पर क्रमांक एम एच ३७ जी ४१०६ मध्ये रेती घेऊन मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे येथे आला होता. सदर रेती खाली करण्याच्या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबावरील विजेच्या तारांना नकळत टिप्परच्या हायड्रोलिक ट्रॉलीचा स्पर्श झाला. वीजपुरवठा सुरू असल्याने याचा टिप्पर चालकास शॉक लागला. या घटनेत टिप्पर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला.


Web Title: Truck driver dies by touching electric wires
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.