शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात कारवाईनंतरही दुचाकीवर ‘ट्रिपलसीट’ प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 10:48 IST

Traffic News शहरात दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवासी वाहतूक हाेत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. 

ठळक मुद्दे दरराेज १००च्यावर वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. शहरात व शहराबाहेर दुचाकीवरून ट्रिपलसीट प्रवास बिनधास्त वाहनचालक करताना दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, वाहनधारकांना वळण लागावे याकरिता शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेद्वारे लाखाे रुपयांचा दंड वसूल केल्यानंतरही शहरात दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवासी वाहतूक हाेत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. वाशिम शहरातील रस्त्यांवर लघुव्यावसायिकांनी आधीच अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात वाटेल तेथे वाहन उभे करून वाहनचालक तासन‌्तास गायब राहत असल्याने वाहतुकीस अडथळा हाेत आहे. यात शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहराबाहेर व प्रत्येक चाैकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची माेहीम शहर वाहतूक शाखेने हाती घेतली आहे. दरराेज १००च्यावर वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. असे असतानाही शहरात व शहराबाहेर दुचाकीवरून ट्रिपलसीट प्रवास बिनधास्त वाहनचालक करताना दिसून आले. विशेष म्हणजे वाहनचालक मास्कचा वापर देखील करीत नसल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.

 

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’! वाशिम शहर वाहतूक शाखेच्या वतीने दरराेज प्रत्येक पाॅइंटवरील कर्मचाऱ्यांने कमीत कमी ३० केसेस करण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याकरिता सकाळपासूनच शहराबाहेर व शहरातील प्रमुख चाैकामध्ये शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात दिसून येत आहेत. येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबवून त्यांच्याकडील कागदपत्राची तपासणी करीत आहेत. तपासणी करताना काहीच आढळून न आल्यास हेल्मेट, मास्क नसल्याचे सांगून दंड आकारून आपले टार्गेट पूर्ण करताना दिसून येत आहेत.

रिसाेड नाका, पुसद नाक्यावर कर्मचाऱ्यांचा अभावशहरातील पाटणी चाैकासाेबतच सर्वात रहदारी व गजबजलेल्या चाैकामध्ये रिसाेड नाका, पुसद नाक्याचा समावेश आहे. परंतु पाटणी चाैकवगळता या प्रमुख चाैकांमध्ये बहुतांशवेळी कर्मचारी दिसून येत नाहीत. शिवाय पाटणी चाैकात बसत असलेल्या लघुव्यावसायिकांना उठविल्यानंतर ते रिसाेड नाका परिसरात येऊन बसतात. याकडे मात्र वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. यासाठी दंड सुध्दा आकारण्यात येत आहे. हळूहळू सुधारणा हाेत आहे. नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.-नागेश माेहाेड, शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस