शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या भिंतीवर उगवली झाडे, कॅनॉल्सही नादुरूस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:44 IST

वाशिम : लघुपाटबंधारे विभागांतर्गत कार्यरत सिंचन व्यवस्थापन विभागातील शाखा अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामांवरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे.

ठळक मुद्दे एकबुर्जी, सोनल आणि अडाण हे तीन मध्यम प्रकल्प असून १२३ लघु प्रकल्प कार्यान्वित आहेत. प्रकल्पांच्या भिंतींवर वाढलेली झाडे तोडून टाकणे, कॅनॉल्सची दुरूस्ती करणे यासह इतर कामे हाती घेऊन पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणे सहजशक्य आहे. भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे अनेक धरणांची सुरक्षितता धोक्यात आली.

वाशिम : लघुपाटबंधारे विभागांतर्गत कार्यरत सिंचन व्यवस्थापन विभागातील शाखा अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे सिंचन व्यवस्थापनाच्या कामांवरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या भिंतीवर उगवलेली मोठी झाडे तोडणे, नादुरूस्त झालेल्या कॅनॉलची दुरूस्ती यासह सिंचन व्यवस्थापनाची इतरही अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकही मोठा सिंचन प्रकल्प उभा राहू शकला नाही. एकबुर्जी, सोनल आणि अडाण हे तीन मध्यम प्रकल्प असून १२३ लघु प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यापैकी सुमारे ८० प्रकल्प आजमितीस कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही जेमतेम जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सुकलेल्या प्रकल्पांमधील गाळाचा उपसा करून खोली वाढविणे, प्रकल्पांच्या भिंतींवर वाढलेली झाडे तोडून टाकणे, कॅनॉल्सची दुरूस्ती करणे यासह इतर कामे हाती घेऊन पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणे सहजशक्य आहे. मात्र, याकामी जलसंपदा विभागाने कुठलीच हालचाल केलेली नाही. तथापि, भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे अनेक धरणांची सुरक्षितता धोक्यात आली असून याकडे लक्ष पुरविण्याची मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. जुन्या प्रकल्प परिसरातील कॅनॉल्सच्या दुरूस्तीची काही कामे हाती घेण्यात आली आहेत. नव्याने उभारल्या जाणाºया प्रकल्पांना मात्र कॅनॉल्सऐवजी थेट पाईपलाईनचाच पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय प्रकल्पांच्या भिंतींवर उगवलेली झाडे तोडण्याची कामेही प्रथम प्राधान्याने हाती घेवून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. - प्रमोद मांदळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमDamधरण