३३ कोटी वृक्षलागवडीचे ८८ टक्के उद्दीष्ट पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:37 PM2019-09-04T14:37:56+5:302019-09-04T14:38:01+5:30

३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उ

Tree plantation fulfills 88% in Washim district | ३३ कोटी वृक्षलागवडीचे ८८ टक्के उद्दीष्ट पूर्ण!

३३ कोटी वृक्षलागवडीचे ८८ टक्के उद्दीष्ट पूर्ण!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करून १ जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत ३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित सव्वा पाच लाख वृक्षांची ३० सप्टेंबरपर्यंत लागवड करावी लागणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.
शासनाच्या वनविभागाने ३ वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निश्चित केले असून याअंतर्गत १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१७ च्या पावसाळ्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड योजना सर्वत्र पार पडली; तर १ जुलै २०१९ पासून वृक्षलागवडीच्या तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण करावे लागणार असून ३ सप्टेंबरपर्यंत त्यापैकी ३७ लाख ७५ हजार वृक्ष प्रत्यक्षात लावण्यात आली आहेत. यात वनविभाग, सामाजिक वनीकरण यासह जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती, चार नगर पालिका, दोन नगर परिषदा, शाळा-महाविद्यालये व प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाकडे देखील विशेष लक्ष पुरविले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.
(प्रतिनिधी)

 

Web Title: Tree plantation fulfills 88% in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.