शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकिकडे वृक्षलागवडीसाठी आटापिटा; दुसरीकडे वृक्षसंवर्धनाकडे कानाडोळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:35 IST

वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आढावा घेतला   जात आहे तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने वृक्षतोडीवरून दिसून येते.

ठळक मुद्दे वाशिम ते अनसिंग, वाशिम ते मालेगाव या मार्गावर आग लावून जवळपास २० ते २५ वृक्षांची कत्तल करण्यात आली. यापूर्वी वाशिम ते मालेगाव या  मार्गावरील वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. वृक्षरोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींनी शुक्रवारी केली.

वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात वाशिम जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आढावा घेतला   जात आहे तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने वृक्षतोडीवरून दिसून येते. वाशिम ते अनसिंग, वाशिम ते मालेगाव या मार्गावर आग लावून जवळपास २० ते २५ वृक्षांची कत्तल करण्यात आली. 

पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्यभरात वृक्ष लागवड मोहिम राबविली जात आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. सन २०१६ आणि २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध प्रजातींचे जवळपास ५ लाख वृक्ष लागवड केली होती. येत्या १ ते ३१ जुलै या कालावधीतही १३.८८ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले. कोणत्या विभागाने किती वृक्ष लागवड करावी याचे नियोजन केले असून, जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यासाठी आढावाही घेतला जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन करण्यासाठी फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याने रस्त्यालगतच्या वृक्षांना आग लावून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याचे दिसून येते. वाशिम ते अनसिंग या मार्गावर आग लावून एका वृक्षाची कत्तल केल्याची बाब ३० मे रोजी उघडकीस आली. यापूर्वी वाशिम ते मालेगाव या  मार्गावरील वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. वृक्षरोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींनी शुक्रवारी केली.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरण