शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आईचा पत्ता लागण्यापूर्वीच बिबटचा बछडा जंगलात पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 16:29 IST

आईचा शोध घेऊन त्याला तिच्या जवळ सोडण्याच्या प्रयत्नात झालेल्या निष्काळजीमुळे पिंजरा उघडल्याने हा बछडा पिंजºयाबाहेर पडून जंगलात पसार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चार दिवसांपूर्वी पांगराबंदीच्या जंगलात कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबटच्या बछड्याला वनविभागाने सुखरुप बाहेर काढले खरे; परंतु त्याच्या आईचा शोध घेऊन त्याला तिच्या जवळ सोडण्याच्या प्रयत्नात झालेल्या निष्काळजीमुळे पिंजरा उघडल्याने हा बछडा पिंजºयाबाहेर पडून जंगलात पसार झाला. त्याचा शोध वनविभागाला लागला असून, आता त्याची आई त्याच्याकडे येतेय का, हे पाहण्यासाठी वनविभाग त्याच्यावर पाळत ठेवून आहे. बिबट्याचा एक बछडा (पिल्लू) सोमवार १४ एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील पांगराबंदीच्या जंगलातील एका कोरड्या विहिरीत पडला होता. ही माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीर, वत्सगुल्म जैवविविधता संस्था वाशिमच्या सदस्यांच्या सहकार्याने मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाºयांनी त्याला चार तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढले. तथापि, या बछड्याला पिंजºयात कायम ठेवणे योग्य नसून, त्याला त्याच्या अधिवासात सोडणे आवश्यक होते; परंतु त्यासाठी त्याच्या आईचा शोध घेऊनच ही मोहिम पार पाडावी लागणार होती. त्यामुळे वनविभागाने पिंजरा जंगलात नेऊन एका जागेवर ठेवला, तसेच परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून त्यावर पाळत ठेवली. बिबटच्या पिलाची आई त्याच्याजवळ आल्याची खात्री झाली की, मग पिंजºयाच्या फाटकाला बांधलेली दोरी ओढून त्याला बाहेर सोडण्यात येणार होते; परंतु हा प्रकार घडण्यापूर्वीच पिंजºयाच्या फाटकाची दोरी तुटली आणि फाटक उघडल्याने त्या बछड्याने धुम ठोकली. या बछड्याची शिकार करण्याची क्षमता नसून, तो सर्वस्वी त्याच्या आईवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याचा जीव आता धोक्यात आहे. दरम्यान, वनविभागाला तो बछडा दिसला असून, आता त्याची आई त्याच्याजवळ येते काय, त्यासाठी पाळत ठेवली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगलforest departmentवनविभाग