शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची अंमलबजावणी संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:56 IST

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय शासनाने फेब्रूवारी २०१६ मध्ये घेतला. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अगदीच संथगतीने होत असून अधिकांश ठिकाणी पारंपरिक ऊर्जेचाच वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतच चालली आहे. यामुळे पारंपरिक उर्जा स्त्रोतांवर मोठा भार पडत आहे. त्यावर पर्याय म्हणून शासनाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सौर व जैविक ऊर्जास्त्रोतांचा वापर करुन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय शासनाने फेब्रूवारी २०१६ मध्ये घेतला. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अगदीच संथगतीने होत असून अधिकांश ठिकाणी पारंपरिक ऊर्जेचाच वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.राज्यात नवीन व नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांव्दारे शासकीय, निमशासकीय संस्था, शासकीय, शैक्षणिक संस्था यासह शासकीय रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आदिवासी व सामाजिक न्याय विभागाची वसतीगृह, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच सार्वजनिक उपयोगाच्या शासकीय इमारतींवर पारेषणविरहित सौर विद्यूत प्रकल्प बसविले जाणार होते. यासाठी लागणाºया निधीची संपूर्ण तरतूद जिल्हा वार्षिक सर्वसाधारण निधीतून करावी आणि यामाध्यमातून आगामी ५ वर्षांत किमान १५० मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये निर्धारित केले होते. प्रत्यक्षात मात्र दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही या निर्णयाच्या अंमलबजावणीला म्हणावी तशी गती मिळालेली नाही. आजही नमूद बहुतांश ठिकाणी पारंपरिक ऊर्जेचाच वापर सुरू असून महिन्याकाठी लाखो रुपयांचे देयक अदा केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे.‘पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प’ या धोरणांतर्गत इमारतीचे छत (रुफटॉप) व जमिनीवरील पारेषणविरहित सौर विद्यूत संच आस्थापित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण नियतव्ययाच्या तीन टक्केनुसार आगामी ५ वर्षे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण निधीतून रकमेची तरतूद करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कुठल्याच यंत्रणेने निधीची मागणीच केलेली नाही. त्यामुळे तशी तरतूद देखील करण्यात आलेली नाही.- भारत वायाळजिल्हा नियोजन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमelectricityवीज