शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तोरणाळा, म्हसणीवासी काढताहेत अंधारात रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 16:42 IST

इंझोरी (वाशिम): दापूरा वीज उपकेंद्रान्ला जोडलेल्या तोरणाळा आणि म्हसणी गावांत खंडीज वीज पुरवठ्याच्या प्रकाराचा कहर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): दापूरा वीज उपकेंद्रान्ला जोडलेल्या तोरणाळा आणि म्हसणी गावांत खंडीज वीज पुरवठ्याच्या प्रकाराचा कहर होत आहे. रात्रीला दररोज वीज पुरवठा खंडीत होत असल्याने येथील ग्रामस्थ रात्र अंधारात काढावी लागत आहे. महावितरण मात्र, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण सांगत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दापूरा वीज उपकेंद्रावरुन इंझोरी सर्कलमधील जवळपास १० ते १५ गावांना वीज पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या सर्कलमधील काही गावांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यात मानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या म्हसणी आणि तोरणाळा येथील वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी खंडीत झालेला वीज पुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत सुरळीत होत नाही. तर दिवसाला खंडीत झालेला वीज पुरवठाही १२ तास सुरळीत केला जात नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना प्रभावित होऊन ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, तर पीठ गिरण्या बंद राहत असल्याने भात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. त्याशिवाय लघू उद्योगांवरही परिणाम होत असून, मोेबाईल रिचार्ज करण्यात अडचणी येत असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी संपर्क साधणेही ग्रामस्थांना कठीण झाले आहे. महावितरणकडे या संदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारही केली जाते; परंतु मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास विलंब लागतो, असे कारण महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे. 

दापूरा वीज उपकेंद्रांतर्गत वादळी वाºयामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. ग्रामस्थांना अडचणी येऊ नयेत म्हणून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्नही केले जात आहेत. एखादवेळी मनुष्यबळाच्या अभावामुळे तांत्रिक बिघाड दूर करण्यास विलंब होतो. त्यावरही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-आशिष कुंभारेकनिष्ठ अभियंतावीज उपकेंद्र, दापुरा (ता.मानोरा)

तोरणाळा, म्हसणी येथील वीज पुरवठा १२ तास खंडीत ठेवला जातो. महावितरणकडे विचारणा केल्यानंतर अपुºया मनुष्यबळामुळे तांत्रिक बिघाड दूर करण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात येते. वीज पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा प्रभावित होत आहेच शिवाय पीठ गिरण्या बंद राहत असल्याने खिचडी खाऊन दिवस काढावे लागत आहे. - सिताराम बालूसिंग पवार सरपंच तोरणाळा, ता. मानोरा

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण