मतदार दिनानिमित्त आज कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:27+5:302021-01-25T04:41:27+5:30

---------------- शौचालय बांधकामाची पाहणी केनवड : ३१ जानेवारीपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार ...

Today's program on the occasion of Voters' Day | मतदार दिनानिमित्त आज कार्यक्रम

मतदार दिनानिमित्त आज कार्यक्रम

Next

----------------

शौचालय बांधकामाची पाहणी

केनवड : ३१ जानेवारीपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार केनवड जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये स्वच्छता विभागाच्या चमूने शुक्रवार, शनिवारी शौचालय बांधकामांची पाहणी केली.

---------------------------जिल्हा परिषद शाळांचे निर्जंतुकीकरण

रिठद : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याने रिठद परिसरात पूर्वतयारी केली जात आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या नऊ शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात आली.

-----------------------------

सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

अनसिंग : जिल्हा परिषद गटाचे गाव असलेल्या अनसिंग येथे सरपंचपदासाठी इच्छुकांनी पॅनल प्रमुखांकडे फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. अद्याप आरक्षणाची तारीख जाहीर झाली नसल्याने प्रत्येक जण सरपंचपदासाठी बाशिंग बांधून असल्याचे दिसून येते.

----------------------------

तोंडगाव येथे आरोग्यविषयक कार्यक्रम

तोंडगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तोंडगाव येथे शनिवारी जनजागृतीपर आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यात आला. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी केले.

Web Title: Today's program on the occasion of Voters' Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.