लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात घरगुती विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडे जूनअखेर १० कोटी रुपये थकबाकी असून, ती वसूल होणे कठीण झाल्यामुळे महावितरण हैराण झाले आहे. जिल्ह्यात वीज वितरणचे २ लाख १९ हजार ग्राहक आहेत. माहेवारी वसूल होणाऱ्या देयकातून ७० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च केली जाते; उर्वरित ३० टक्के रकमेतून प्रशासकीय खर्चासह इतर खर्च भागवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांनी थकबाकी अदा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विजेची १० कोटी रुपये थकबाकी
By admin | Updated: July 4, 2017 02:23 IST