शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील तीनही मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:12 IST

 जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता मिटली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हयात असलेल्या ३  मध्यम व १३३ लघु प्रकल्पात जलसाठा बºयापैकी साठल्याने जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे. तीनही मध्य प्रकल्पासह ४६ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून उर्वरित लघुप्रकल्पातही ७५ टक्के व काहींमध्ये यापेक्षा जास्त जलसाठा निर्माण झाला आहे.सुरुवातील अत्यल्प पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही जिल्हावासियांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार असे चिन्ह दिसून येत होते. परंतु गत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या  जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता मिटली.यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला नव्हता.त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतांनाच गत पंधरा दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे  पाणी टंचाईची चिंता दूर झाल्याचे दिसून येत आहे. े सर्वत्र जोरदार पावसााने प्रकल्प तुडूंब भरले तर नदि, नाले दुथडी भरुन वाहू लागले. शिवाय भुगभार्तील पाणी पातळीत देखील वाढ झालेली दिसून येत आहे . जिल्हावासियांना जाणवणारी टंचाई दूर झाली असली तरी या पावसाने मात्र, शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान केल्याने त्यांच्यावर आर्थीक संकट कोसळलेले दिसून येत आहे. सर्वत्र पीक काढणीच्या तोंडावर झालेल्या पावसाने पीक नष्ट होवून बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.  जिलहयात झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प ओव्हर फ्लो तर अनेक प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असून  यामध्ये प्रामुख्याने एकबुर्जी, सोनल, अडाण हे तीन मध्यम प्रकल्प तुडूंब भरले असून वाशिम तालुक्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी ३० प्रकल्पांमध्ये, मालेगाव तालुक्यातील २३ पैकी २१, कारंजा तालुक्यातील १६ पैकी ६, मंगरूळपीर १५ पैकी ११, रिसोड तालुक्यातील १८ पैकी १३ तर मानोरा तालुक्यातील २५ पैकी १० प्रकल्प अशा एकूण १३३ लघु प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आजमितीला उपलब्ध झाला  आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण