शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार; दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:15 IST

घटना धनज परिसरातील धनज-भिवरी आणि कामरगाव-लाडेगाव या मार्गावर १९ आॅगस्ट रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. (वाशिम) : दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तीन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धनज परिसरातील धनज-भिवरी आणि कामरगाव-लाडेगाव या मार्गावर १९ आॅगस्ट रोजी घडली. धनज-भिवरी मार्गावरील अपघातात सुभाष पांडुरंग टाके (६५) रा. अमरावती व प्रताप शामलाल मोहीते (३०) रा. पिंपळगाव तर कामरगाव-लाडेगाव मार्गावरील अपघातात प्रांजळ शंकरराव गजभिये (२६)  रा. लाडेगाव हे ठार झाले.एमएच २७ क्यू ७५८६ क्रमांकाच्या दुचाकीने मृतक सुभाष टाके व अभिजित सुभाष टाके (१९) हे धनज येथून भिवरीकडे १९ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येत होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीचा व टाके यांच्या दुचाकीचा धनज-भिवरी मार्गादरम्यान भीषण अपघात झाला. यामध्ये सुभाष टाके व प्रताप मोहिते हे दोघे ठार झाले तर अभिजित टाके हा गंभीर जखमी झाला. जखमीला धनज प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान धनज पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस करीत आहेत.दुसºया एका घटनेत दुचाकीची बैलाला धडक लागून प्रांजळ शंकरराव गजभिये यांचा मृत्यू झाला तर अमोल वसंतराव सवाई (३०) रा. लाडेगाव हा युवक गंभीर जखमी झाला. प्रांजळ गजभिये आणि अमोल सवाई हे दोघेजण १९ आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या ुसुमारास एमएच ३० क्यू ९९९२ क्रमांकाच्या दुचाकीने कामरगाव येथून लाडेगावकडे जात होते. कामरगावपासून दोन किमी अंतरावर दुचाकीची बैलाला जबर धडक लागली. या धडकेत प्रांजळ गजभिये ठार तर अमोल सवाई हा जखमी झाला. या घटनेची नोंद कामरगाव चौकितील पोलिसांनी घेतली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कपील म्हस्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम व रविंद्र राजगुरे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात