शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील तीन आश्रमशाळांंची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:18 IST

वाशिम: राज्यशासनाच्या आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांत विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यशासनाच्या आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांत विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय आश्रमशाळांतील सुविधांची तपासणी करण्यात येत असून, यात वाशिम जिल्ह्यातील तीन शाळांचा समावेश आहे. या संदर्भातील परिपत्रक ६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले असून त्या अनुषंगाने जिल्हयातील तीन शाळांची तपासणी होणार आहे.  स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आदिवासी विकास विभागांतर्गत येणाºया शासकीय आश्रमशाळेतील पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्थेमधील दुरुस्ती व आवश्यकतेनुसार नवीन बांधका करणे, तसेच स्वयंपाकगृह, भोजनकक्ष, कोठीगृहे, वीजपुरवठा, आदि सुविधांमध्ये वाढ करणे, तसेच नवीन सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने ७ एप्रिल २०१७ च्या परिपत्रकान्वये विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबविण्यात आला. सध्याही शासकीय आश्रमशाळेतील भौतिक व मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी  पाठपुरावा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विशेष दुरुस्ती व कायापालट अभियान राबविण्यात येत असून, सुविधा नियमित मापदंडानुसार उपलब्ध होणे आवश्यक असताना अद्याप काही आश्रमशाळांत या सुविधा शाश्वतपण उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने आश्रमशाळांची तपासणी करण्याचे ठरविले असून, या अंतर्गत जिल्ह्यातील शेलुबाजार, मुसळवाडी आणि किन्हीराजा येथील आश्रमशाळांची तपासणी करण्यात येणार आहे.  यामध्ये समस्या आढळल्यास त्या सुधारण्यात येणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा