शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट ! ‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या माळेगावातील भीषण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 17:01 IST

वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आल्याने, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना गत दीड महिन्यांपासून घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपिट करावी लागत असल्याचे वास्तव आहे. 

वाशिम : वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आल्याने, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना गत दीड महिन्यांपासून घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपिट करावी लागत असल्याचे वास्तव आहे. माळेगाव येथे दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निर्माण होते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यापूर्वी प्रशासनाने प्रयत्नही करण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माळेगावात जलसंधारणाची कामे करण्यात आली. जलसंधारणाच्या कामानंतर सर्वे केला असता, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१   असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रशासनाच्या लेखी माळेगाव हे गाव पाण्याच्या दृष्टिने परिपूर्ण आहे. प्रत्यक्षात या गावाला भेट दिली असता, परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून आले. माळेगाव येथे पाणीपुरवठा योजना असून, सद्यस्थितीत पाणीपुरवठा करणारी विहिर कोरडीठण्ण असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. गावातील हातपंप, विहिरींनी तळ गाठल्याने गावापासून गावापासून दीड किमी अंतरावर असलेल्या एका विहिरीवरून सायकल, बैलबंडी किंवा मिळेल त्या साधनांनी पाणी आणण्याची कसरत गावकºयांना करावी लागते. या विहिरीत साधारणत: एक महिना पुरेल एवढा जलसाठा असल्याने एका महिन्यानंतर काय? या विचाराने गावकºयांची झोप उडाली आहे. प्रशासनाच्या लेखी माळेगाव १०० टक्के ‘वॉटर न्यूट्रल’ अर्थात पाण्याने परिपूर्ण आहे तर दुसरीकडे गावकºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, अशी विसंगत परिस्थिती माळेगावात दिसून येते. - कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. प्रशासनाकडून कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही. मागील दीड महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.- भीमराव राघोजी जाधव, ग्रामस्थ, माळेगाव ता.जि. वाशिम

टॅग्स :washimवाशिम