शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या सतर्कतेमुळे अट्टल चोरटा जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 16:36 IST

वाशिम : तालुक्यातील काटा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाºया टोळीतील एका चोरट्याला गावकºयांनी हर्षा नितीन खडसे या महिलेच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील काटा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाºया टोळीतील एका चोरट्याला गावकºयांनी हर्षा नितीन खडसे या महिलेच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडले. ही घटना १ फेब्रुवारीला रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. वाशिम येथील सामान्य रूग्णालयाच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी विशाल कालबाल्या चव्हाण (वय २८) याच्यासह अन्य तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी १ फेब्रुवारीला रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास काटा गावात चांगलाच धुमाकुळ घातला. या चोरट्यांनी गावातील घनश्याम पोरवाल, वसंतकुमार बांडे, शिवाजी इंद्रभान कंकणे यांचे बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, पोरवाल यांच्या घराचे कुलूप तोडत असताना शेजारीच वास्तव्यास असलेल्या हर्षा खडसे यांना आवाज आल्याने त्या झोपेतून जाग्या झाल्या. त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता, समोरच्या घरामध्ये चोरटे शिरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेच ही माहिती त्यांनी आपले पती नितिन खडसे यांना दिली. यावेळी पळून जाणाºया चोरट्यांचा नितिन खडसे यांनी पाठलाग केला. त्यामधील विशाल चव्हाण हा एकमेव चोरटा त्यांच्या हाती लागला. यावेळी विशाल चव्हाणने नितिन खडसे यांच्यावर चाकुने हल्ला करून त्यांना जखमी केले. प्रसंगावधान राखून खडसे यांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावून त्याला पकडून ठेवले. त्यानंतर गावकºयांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याला अटक करून त्याच्याविरूध्द भादंविचे कलम ३७९, ५११, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजय नरडे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी