शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ६४३ शाळा राहणार मुख्याध्यापकांविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 14:12 IST

२०१९-२० च्या शैक्षणिक सत्रात केवळ १ ते ५ च्या मर्यादेत शिक्षक कार्यरत राहणार असून अधिकृत मुख्याध्यापक मिळणार नसल्याची नामुष्की ओढवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या २६ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अपेक्षित प्रमाणात पटसंख्या ठेवण्यात यंदाही शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील ७७५ प्राथमिक शाळांपैकी तब्बल ६४३ शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी असल्याने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये अशा सर्व शाळा २०१९-२० या शैक्षणिक सत्रात अधिकृत मुख्याध्यापकांविना असणार आहेत.जिल्हा परिषद शाळांमध्ये पुर्वी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत पूर्वप्राथमिक, पाचवी ते सातवी प्राथमिक आणि इयत्ता आठवी ते दहावी माध्यमिक असे स्वरूप होते. त्यात शालेय शिक्षण विभागाने मध्यंतरी बदल करून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडला आणि आठवी ते दहावीच्या शाळांना सहावीपासूनचे वर्ग जोडण्यात आले. काही ठिकाणी तर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडला गेला. या सर्व गदारोळात अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्याचा थेट परिणाम ज्ञानार्जनावर होवून बहुतांश शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावण्यास ही बाब प्रामुख्याने कारणीभूत ठरली. त्यामुळेच वर्षागणिक पटसंख्या घटत चालल्याचे बोलले जात आहे.प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ७७५ प्राथमिक शाळा असून त्यातील तब्बल ६४३ शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे. यातीलच ३३६ शाळांना ५० ची पटसंख्याही गाठता आलेली नाही. काही शाळांची तर अत्यंत दयनिय अवस्था असून १५ पेक्षाही कमी पटसंख्या असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये अशा सर्व शाळांवर २०१९-२० च्या शैक्षणिक सत्रात केवळ १ ते ५ च्या मर्यादेत शिक्षक कार्यरत राहणार असून अधिकृत मुख्याध्यापक मिळणार नसल्याची नामुष्की ओढवली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न केले जात आहे; मात्र दर्जेदार शिक्षण मिळूनही ग्रामीण भागातील अधिकांश पालकांनी जिल्हा परिषद शाळांकडे पाठ फिरवल्यानेच पटसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.- अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा