शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात जखमी वन्यप्राण्यांसाठी निवाऱ्यांची व्यवस्थाच नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:43 IST

वाशिम: रस्ता ओलांडताना किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर दीर्घ उपचार गरजेचे असतात. अशात त्यांना पशूवैद्यकीय दवाखान्यांतही ठेवावे लागते; परंतु यासाठी आवश्यक निवाऱ्याचा जिल्ह्यात अभाव असल्याने उपचार करूनही वन्यप्राणी दगावत आहेत.

ठळक मुद्देवन्यप्राणी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने किंवा इतर कारणांनी गंभीर जखमी होतात. गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांवर दीर्घ उपचार करणे आवश्यक असते, तसेच त्याची देखरेखही आवश्यक असते. निवारा नसल्याने त्यांना कोठे ठेवावे हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे उपचार करूनही वन्यप्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत.

वाशिम: रस्ता ओलांडताना किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर दीर्घ उपचार गरजेचे असतात. अशात त्यांना पशूवैद्यकीय दवाखान्यांतही ठेवावे लागते; परंतु यासाठी आवश्यक निवाऱ्याचा जिल्ह्यात अभाव असल्याने उपचार करूनही वन्यप्राणी दगावत आहेत. ही गंभीर लक्षात घेऊन जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या मंगरुळपीर येथे जखमी वन्यप्राण्यांसाठी निवाऱ्यांची व्यवस्था करण्याची मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्याकडे केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात वन्यप्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, या वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी पुरेशी यंत्रणा वाशिम जिल्ह्यात नाही. वाशिम जिल्हा जंगली भागाने वेढला आहे. त्यातच या जिल्ह्यात काटेपूर्णा आणि सोहळ अशी दोन अभयारण्ये आहेत. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा येथे निसर्ग पर्यटन केंद्रही प्रस्तावित आहे. जिल्ह्यात निलगाय, काळविट, हरण आदि वन्यप्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे. यातील काही वन्यप्राणी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने किंवा इतर कारणांनी गंभीर जखमी होतात. या प्राण्यांना उपचारासाठी नेआण करण्यासाठी अ‍ॅम्बुलन्स नाहीच शिवाय स्वयंसेवी, आपत्कालीन संस्था किंवा वन्यजीव प्रेमींनी या वन्यप्राण्यांना उपचारास आणल्यानंतर त्यांना पशुवैद्यकीय केंद्रांत ठेवण्यासाठी निवाराही नाही. गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांवर दीर्घ उपचार करणे आवश्यक असते, तसेच त्याची देखरेखही आवश्यक असते. तथापि, निवारा नसल्याने त्यांना कोठे ठेवावे हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे उपचार करूनही वन्यप्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत. वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुका केंद्रस्थानी असून, या ठिकाणी पशुवैद्यकीय केंद्रही आहे. त्यामुळे या ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांच्या निवाºयाची व्यवस्था येथे के ल्यास शेकडो वन्यप्राण्यांना उपचाराखाली ठेवून त्यांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीचे प्रमुख तथा मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. मंगरुळपीर येथे असलेले पशुवैद्यकीय केंद्र हे जिल्हा परिषद वाशिमच्या अधिनस्थ असल्याने या ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांसाठी निवारा उभारावा, अशी मागणी त्यांनी त्या निवेदनातून केली आहे.  

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव