वाशिम : ग्रामीण परिसरात शेतामधील स्प्रिंकलरचे साहित्य चोरणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. यामध्ये एका इसमासह दोन महिलांचा समावेश आहे. ही कार्यवाही १८ जानेवारी रोजी दुपारचे सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी आज शहरामध्ये बाजार असल्याने गस्तीवर होते. या पथकाला एक पुरुष व दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्यांची तपासणी केली असता वाशिम तालुक्यातील उकळी सुकळी येथील सिकलाल मोतिराम पवार, सुनीता सिकलाल पवार व उमा अजय पवार या तिघांजवळ ७ हजार रुपये किमतीचे स्प्रिंकलर साहित्य आढळून आले.
चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: January 19, 2015 02:46 IST